मिळकतधारकांसाठी महापालिकेची ‘अभय योजना’, मनपा शास्ती करात मिळणार सवलत

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मिळकतधारकांकरिता दिनांक 22 जानेवारी पासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कममध्ये सवलत देणेची अभय योजना राबविणेत येणार आहे. विहित मुदतीत मिळकतकर न भरणा-या मिळकतधारकांना प्रती महा 2 टके दराने मिळकतकर बिलामध्ये मनपाकर शास्ती (दंड) म्हणून आकारणेत येत आहे.

मिळकतकराची थकबाकीसह संपूर्ण कराचा एक रक्कमी भरणा करणा-या मिळकतधारका करिता महापालिकेमार्फत अभय योजना राबविण्यात येत असून जे मिळकतधारक दिनांक 31 जानेवारी पूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा करतील त्यांना एकूण मनपाकर आस्ती (दंड) रकमेच्या 90 टके सवलत देण्यात येणार आहे. तसेच दिनांक 01 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपूर्ण मिळकत कराचा भरणा करतील त्यांना मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेच्या 80 टक्के व दिनांक 01 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेचे 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालय सार्वजनिक व सामाहिक सुट्टीचे दिवशी सुरु राहणार असून मिळकतधारकांना कराची रक्कम रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करना येईल.

तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे . ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकतकर भरणा केलेला नाही. अशा मिळकतधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मिळकत कराच्या थकीत रक्कमा आहेत, अशा थकबाकीदारांचे मिळकती जमीची कार्यवाही करणेत येणार आहे, असा इशारा कर सकंलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिला आहे.

Share to