वाहतुकीस अडथळा ठरणा-या पत्राशेड व टप-यांवर धडक कारवाई
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने आज वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील 18 पत्राशेड व 12 अनधिकृत टपऱ्या हटविण्याची कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार सुरू आहे. शहराच्या विविध भागात दररोज कारवाई केली जात आहे. सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. क प्रभाग अंतर्गत खंडेवस्ती चौक, इंद्रायणी नगर, मोई चौक, जाधववाडी – कुदळवाडी, जय गणेश साम्राज्य चौक, इंद्रायणी नगर येथील 12 टपऱ्या, 18 अनधिकृत पत्राशेड, 6 हातगाड्यावर अतिक्रमणची कारवाई करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, दिपाली जगदाळे, अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.