माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रभाग क्र १९ आनंद नगर मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधी समिती सभापती काळूराम पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आनंद नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी विधी समिती सभापती काळूराम पवार यांच्या हस्ते परीसरातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आनंदनगर परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

Share to