डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापालिकेतर्फे अभिवादन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस आणि पिंपरीतील एच.ए. कॉलनी, व दापोडी येथील पुतळ्यास आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समवेत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य संयोजक संजय भोसले, ह क्षेत्रिय अधिकारी विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक तसेच गणेश भोसले, तुकाराम गायकवाड आदि उपस्थित होते.

Share to