पावसामुळे पवना धरणातील पाणी साठ्यात 2.6 टक्केच वाढ, कपातीची टांगती तलवार कायम
पिंपरी – पिंपरी-चिंचवडची तहान भागवणा-या मावळातील पवना धरणाच्या पानलोट क्षेत्रात मागील 24 तासात 55 मिली मीटर पाऊस झाला. तर, लोणावळा परिसरात 146 मिली मीटर पावसाची नोंद झाली. आता धरणातील पाणी साठ्यात 2.6 टक्केने वाढ झाली. मागील वर्षी जूनमध्ये झालेल्या पावसाच्या तुलनेत धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होणे अपेक्षित आहे.
पवना धरण परिघात पडणा-या पावसाचे अनुमान
- गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 55 मि.मि.
- 1 जूनपासून झालेला पाऊस = 392 मि.मि.
- गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.6 टक्के
- धरणातील सध्याचा पाणीसाठा = 19.45 टक्के
- 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 2.6 टक्के
- गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस = 545 मि.मि.
- गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.28 टक्के