प्लॉगेथॉन मोहिमेत केएसबी चौक ते टाटा मोटर्सचा रस्ता चकाचक
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छाग्रह उपक्रमा अंतर्गत आयोजित प्लॉगेथोन मोहिमेत केएसबी चौक ते टाटा मोटर्स यशवंतनगर चौक रस्त्यावरील सुमारे ६ टन कचरा उचलण्यात आला.
आज सकाळी नऊ वाजता पासून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. त्यामध्ये सह शहर अभियंता रामदास तांबे,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, शशिकांत मोरे, यांचेसह मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जिनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे व वाघमारे आणि सौदे यांच्या सह ग्रीन रॉबिन हूड आर्मी या स्वयंसेवी संस्थेचे अमित अगरवाल, सुजीत पाटील, करिश्मा गांधी, आरुशी अगरवाल, देव आशिष, आकाश अगरवाल, सायाम रेहमान, जानवी, प्रणित वाबले, नचिकित खैरे, चेतन राव, ओंकार प्यारपाती यांच्या सह सुमारे ८० अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.