महापालिकेकडून अतिक्रमणाची सफाई; टप-या, रसवंती गृह, हातगाड्यांवर कारवाई
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय अतिक्रमण पथकाचे वतीने नेहरूनगर ते पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फूटपाथ वरील १५ टपऱ्या, ४ रसवंती गृह, ३२ फुटपाथवरील अतिक्रमणे तसेच हातगाड्या वर कारवाई करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नेतृत्वात बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट,शेवलकर योगेश निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, दिपाली जगदाळे, राजश्री सातळीकर, प्रियंका शिंदे,अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, तृप्ती महांडुळे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.