हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचारासाठी जागृतीरथाचे उद्घाटन
पिंपरी – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या मोहीमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात तिरंगा बाबत प्रचार व प्रसार करणाऱ्या जनजागृती रथाचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून त्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके,माहिती, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,खुशाल पुरंदरे उपस्थित होते. या रथाद्वारे शहरभर सर्वत्र जनजागृती करण्यात येणार आहे.