ज्यांना मंत्रीमंडळाबाहेर ठेवले त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, जयंत पाटील यांची कोपरखळी

मुंबई – शिंदे यांच्यासोबत जे ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते पाहीजे होते. प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे हिंदुत्व वगैरे हा मुद्दा नव्हता. आता ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, असंच म्हणावं लागेल, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मारली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना पुष्पचक्र वाहून त्यांनी अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तब्बल ३६ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला. जवळपास महिनाभर राज्यात एकही मंत्री नव्हता, असे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाले नाही. मात्र उशीरा का होईना शपथविधी होत आहे. आता शपथविधीनंतर सत्कार समारंभ वगैरे महिनाभर चालवण्यापेक्षा महाराष्ट्रात संकटात असलेला आमचा शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने धाव घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री लवकरच खातेवाटप करून आणि पालकमंत्री नेमून त्यांना जिल्ह्याजिल्ह्यात पाठवतील, अशी अपेक्षा जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच शिंदे यांच्यासोबत जे ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे होते. जे आधीच मंत्री होते, त्यांना चांगले खाते पाहीजे होते. प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते. त्यामुळे हिंदुत्व वगैरे हा मुद्दा नव्हता. आता ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले आहे, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला, असंच म्हणावं लागेल, अशी कोपरखळीही जयंतराव पाटील यांनी मारली. काही चुकीच्या प्रकरणांमध्ये नाव असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हा सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. जेव्हा विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होईल, तेव्हा आम्ही सभागृहात आमची भूमिका मांडू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना पुष्पचक्र वाहून त्यांनी अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

Share to