चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये वारकरी दिंडी सोहळा उत्साहात

पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी (दि. २८) रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आल. याप्रसंगी संस्थापक उपाध्यक्ष अनिताताई संदिप काटे, निहारा काटे, लीना काटे आणी उपस्थित प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते विठू माऊली व पालखीची पूजा करण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून मोठया उत्साहात सहभाग घेतला होता. काही बाल कलाकार विठ्ठल रुक्मीणी, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई, संत जनाबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

शाळेच्या संगीत शिक्षिका आणि विद्यार्थी, विद्यार्थीनींनी अभंग सादर केले. तसेच लेझिमचे बहारदार प्रात्यक्षिक सादर केले. सौ. अनिताताई संदीप काटे यांनी याप्रसंगी उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

फुगडया खेळून व रिंगण करून विठ्ठल नामाचा जयघोष केला. यावेळी पालक वर्गातर्फे नारायण दुबरिया, नरहरी उदगिरकर, के. के गुल्हाटी, गीता नायक, रेखा पाटील, मालखेडे, सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी तुळशी वृंदावन व ग्रंथ घेऊन विठुरायाच्या नामघोषात दिंडी सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया बोंडे आणि आभार प्रदर्शन नेहा मगर यांनी केले.

Share to