शिवसेनेच्या वतीने स्व. रमेश देव व गजानन बाबर यांना भावपूर्ण श्रध्दांजली

पिंपरी (प्रतिनिधी) – मराठी चित्रपट सृष्टीतील मानबिंदू रमेश देव यांच्या जाण्याने सिनेजगताने उत्तम अभिनेता हरवला. तर, हवेली मतदार संघातून दोनवेळा आमदार व मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार गजानन बाबर यांच्या जाण्याने एक सच्चा शिवसैनिक गमावला. त्यांच्या जाण्याने पिंपरी-चिंचवड, हवेली व मावळच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने आज दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

पिंपरी-चिंचवड विधानसभेचे संपर्कप्रमुख तथा सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, चिंचवड युवा विधानसभा अधिकारी माऊली जगताप, विभाग प्रमुख श्रीमंत गिरी, शाखाप्रमुख माजिद शेख, राजेश आरसूळ, राजेश आढागळे, किशोर सातपुते, प्रमोद पाटील, सम्राट चांदणे, अनिकेत भोंडवे, योगेश मोरे, सागर चिंचवडे, शुभम मगर, शाखाप्रमुख मज्जित शेख, सुग्रीव आडाळगे, किशोर सातपुते, आकाश भोसले, बापू तांबे, बलवंत धावारे, अनिल बोराडे, माजी शाखाप्रमुख रफिक बेग, पांडुरंग आडाळगे, मुस्तफा शेख यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली. 

Share to