महापालिकेवर काँग्रेसचा हंडा मोर्चा, भाजपाच्या विरोधात तिव्र निदर्शने
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर आज हंडा मोर्चा काढण्यात आला. भाजपाच्या कार्यकाळात दिवसाआड पाणी सोडले जाते. गेल्या पाच वर्षात पाणी प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी भाजपाला आपयश आले. याच्या निषेधार्त काँग्रेसने आज महापालिकेवर हंडा मोर्चा काढला.
नागरिकांना अशुध्द पाणी पुरवठा केला जातो. दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्यामुळे नागरिकांना असंख्य आजारांना समोरे जावे लागत आहे. धरणात मुबलक पाणी असुनसुध्दा सत्ताधा-यांनी नागरिकांवर पाणी टंचाई लादली. केवळ टॅंकर माफियांना पोसण्याचा उद्योग भाजपा करीत आहे. येत्या पंधरा दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर हे आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिला आहे.