शहरातील 1 लाख 88 हजार 838 बालकांना दिले पोलिओचे डोस
पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पिंपरी-चिंचवड शहरातील 1 लाख 88 हजार 838 बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. दरम्यान, शहरात एकही पोलीओचा रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण अंतर्गत शहराच्या विविध भागात पाच वर्षाखालील बालकांना लस देण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या पथकांची नेमणूक केली होती. या मोहिमेसाठी 1029 लसीकरण केंद्रे तयार केली होती. त्यासाठी 8 प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 60 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 220 पर्यवेक्षक, 3 हजार 122 लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले होते.
महाविद्यालयाचे विद्यार्थी, एमपीडब्ल्यू, एएनएस, पिंपरी-चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका तथा इतर शाळा आणि महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अशा व इतर विविध स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले, अशी माहिती डॉ. साळवे यांनी दिली.
महापालिकेने रािाय विपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण
करण्यासाठी शहरामध्ये एकूण १०२९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९१६ ठिकाणी स्थायी लसीकरण
केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३७ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची
पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ७६ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. मोहिमेसाठी ६७ वैद्यकीय अधिकारी, २२० पर्यवेक्षक व ३१२२ लसीकरण कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती डॉ. साळवे यांनी दिली.