रोजगार मेळाव्यात साडेचारशे विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 462 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रातील एकूण 12 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप पंडित, महाविद्यालाचे उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो व डॉ. एच. बी. सोनवणे, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी आणि डॉ. संतोष जगताप, ट्रेनिंग आणि प्लेसमेण्ट अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया कुलकर्णी यांनी केले. डॉ. संतोष जगताप यांनी आभार मानले.