निगडी स्मशानभूमीतील विकास कामांना सुरूवात, नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

  • निगडी स्मशानभूमीचा चेहरा मोहरा बदलणार
  • निगडी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवणे व स्थापत्य विषयक कामांना सुरूवात

पिंपरी (प्रतिनीधी) – गेली अनेक महिने  निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहीनी व स्थापत्य विकास कामे करण्यासाठी आयुक्तांकडे स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका कमल घोलप, नगरसेविका सुमन पवळे वारंवार पाठपुरावा करत होते. त्याला अखेर यश आले असून विकास कामांना सुरुवात झाली आहे.

 महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील निगडी स्मशानभूमी येथे मागील दोन वर्षांपूर्वी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आली होती. निगडी स्मशान भूमी अंतर्गत निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर, कृष्णानगर संभाजीनगर, प्राधिकरण आदि भागातून नागरिक अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मध्ये ये जा करत असतात जास्त लोकसंख्या असल्याने या भागातील मृत्यू दरही त्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी १८वर्ष जुनी विद्युत दाहिनी आहे. ती काढून टाकून त्या ठिकाणी नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात येणार आहे. कल्याणी इंटरप्राईजेस ७२ लाखाची विद्युत दाहिनी बसवण्याचे काम करणार आहे.

४ कोटी ११ लाखाचे स्थापत्य विषयक व विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत.नवीन विद्युत दाहिनी बसविण्याचा व स्थापत्य  विषयक कामासाठी अनुक्रमाने पत्राद्वारे दिनांक १६/०४/२०२१ व दिनांक १७/०५/२०२१ रोजी पाठपुरावा केला होता. लेखाशिर्ष व स्मशानभूमी च्या कामासाठी निधीची तरतुद उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला. स्मशानभूमीत विविध जातींचे लोक अंत्यविधीसाठी येतात त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध होणार असुन २० वर्षापासून धूळ खात पडलेल्या निगडी स्मशानभूमीचा चेहरा मोहरा बदलणार आहे अशी माहिती नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिली आहे.

———————–

मागील तीस वर्षांपूर्वी कै महापौर मधुकर पवळे यांच्यामार्फत विद्युत दाहिनी बसवण्यात आली होती. ती विद्युत दाहिनी कधीही बंद पडत होती. मृतदेह पूर्ण जळत नव्हते. अनेक अडचणीचा सामना आम्हाला व कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. अनेक लोकांचे फोन येत होते. विद्युत दाहिनी बाबत अनेक दिवसापासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा चालू होता त्यानिमित्ताने आज नवीन विद्युत दाहीनीचे काम चालू करण्यात आले. मागील वर्षी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. कालांतराने अजून एक नवीन गॅस दाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्युत दाहिनी वरील लोड कमी होईल.

नगरसेवक सचिन चिखले

स्मशानभूमी मधील कामांचा कायमचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरीकांचा त्रास कमी होईल.अनेक स्थापत्य विकास कामे, शौचालय,प्रतीक्षा शेड,हवा प्रदूषण नियंत्रण संच,सीमाभिंत, सुरक्षा रक्षक खोली इ कामे व विद्युतविषयक कामे करणे गरजेचे होते. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील.

नगरसेवक उत्तम केंदळे

मृतांच्या नातेवाइकांना स्मशानभुमी येथे बसण्यासाठी व इतर सुविधा येणाऱ्या काळात उपलब्ध करण्यात येतील.

नगरसेविका कमला घोलप

प्रभाग क्रमांक १३ मध्ये लोकसंख्या जास्त आहे त्याच प्रमाणात मृत्युदर ही असतो. त्यामुळे नागरिकांना स्मशानभूमि सुसज्ज झाल्याचा फायदा होणार आहे.

नगरसेविका सुमन पवळे

नगरसेवक केंदळे हे मृताच्या नातेवाईकांना प्रत्येक वेळी मदत करत असतात. केंदळे म्हणतात जे काम करतो आहे, ही लोकसेवाच आहे या भावनेने मी करतो. लोकांच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावणं ही जबाबदारी माझ्यावर आहे. मला ती योग्य पद्धतीने पूर्ण करावीच लागेल. सेवा म्हणून मी हे काम करतो.”काही नातेवाईक येतात. तर, काही मृत झालेल्या रुग्णांचे नातेवाईक येत नाहीत. मग, आपणच मनात देवाचं नाव घेवून त्यांना शेवटचा निरोप द्यायचा.

 
Share to