प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस सक्षम व तंदुरुस्त करावे, मंत्री बच्चू कडू यांचे अधिका-यांना आदेश
पिंपरी (प्रतिनिधी) – सहा वर्षाच्या आतील तसेच गर्भावस्थेत दिव्यांगांच्या बाबतीत उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र मजला राखीव ठेवावा. येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगास सक्षम, तंदुरुस्त करून पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मंत्री बच्चू कडू यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी,मोरवाडी येथील अपंग भवनास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा ते बोलत होते. यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, शिवाजी चौरे तसेच स्वीय साह्यक गौरव जाधव प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विनोद गायकवाड, नंदकिशोर जगदाळे, संजय गायखे, संदीप जाधव, मिठालाल सोनी, दत्तात्रय भोसले, अपंग क्रांतिच्या महिला अध्यक्षा संगिता जोशी, एमआयएम संघटनेचे पदाधिकारी धम्मराज साळवे उपस्थित होते.
मोरवाडी येथील अपंग भवन सहा हजार चौरस फूटाचे असून ते चार मजल्यात विभागले आहे.