‘हॅपी स्ट्रीट पिंपळे सौदागर २०२२’ उपक्रमाचे कुणाल आयकॉन परिसरात रविवारी आयोजन

  • मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अनिताताई काटे यांचे नागरिकांना आवाह

पिंपरी (प्रतिनिधी) – सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन परिसरात ‘हॅपी स्ट्रीट पिंपळे सौदागर २०२२’ या उपक्रमाचे रविवारी (दि. ६) पहाटे ५.०० वा. आयोजन करण्यात आले आहे.

लहानांबरोबरच मोठ्यांसाठी झुम्बा, योगा, करमणूक, लाईव्ह म्युझिक, क्रीडा कलाकार, ड्रमसेट म्युझिक, सर्व प्रकारचे खेळ, केक कटिंग, ट्याटू, स्केटिंग, आर्ट अँड क्राफ्ट, बालजत्रा, विविध खेळ, सायकलिंग, ध्यानधारणा, व्यायाम आणि नृत्य असे अनेक उपक्रम या रस्त्यावर आयोजिण्यात येणार आहेत. यात आरजे (RJ) पवन भोजवानी हे विशेष आकर्षण असणार आहेत.

झुम्बा’चे सदस्य जमलेल्या नागरिकांसमोर सामूहिक नृत्य आणि फिटनेसबाबत जनजागृती करणार आहेत. कार्निव्हलच्या मुख्य भागातील मंचावर मुलांसाठी चॉक आर्ट, पपेट शो, जादूचे प्रयोग असतील, तर कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या तरुण-तरुणींना त्यांचे कलागुण दाखवण्याची विशेष संधी मिळणार आहे. मुख्य म्हणजे, एरवी वाहनांनी व्यापलेल्या या रस्त्यावर पायी चालण्याचा आनंद नागरिकांना घेता येणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मौज- मजेचा आनंद लुटावा. तसेच अधिक माहितीसाठी सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Share to