नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा, नेत्यांवर व्यक्त केली नाराजी
पिंपरी (प्रतिनिधी) – भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज (दि. 4) राजीनामा दिला.
नगरसेविका माया बारणे या थेरगावमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. सहा महिन्यापूर्वीच माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे माया बारणे हे राजीनामा देणार हे निश्चित होते. अखेर आज माया बारणे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
यापूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामठे यांनी यापूर्वी राजीनामा दिला होता भाजपामधील भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी सांगितले.