चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात पाच दुकानांना भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान

पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड रेल्वे स्टेशनच्या बाजुला असलेल्या पाच दुकानांना आग लागली आहे. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अजून आग धुमसत असल्याने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत.

चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील पत्राशेडच्या चार ते पाच दुकांनाना अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. 1.45 वा चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आली आहे, तरीही काही ठिकणी आग अजून धुमसत असल्याने जवान ती विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. पत्राशेडची दुकाने असून किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Share to