राजकीय व सामाजिक कार्याबरोबरच लांडे कुटुंबियांनी जपला आध्यात्मिक वारसा

  • इंद्रायणीनगरमध्ये श्री रामकथेच्या माध्यमातून होणार रामनामाचे पठण
  • नगरसेवक विक्रांत लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) – वाढदिवसाचे निमित्त साधत अनेक जण वारेमाप अनावश्यक खर्च करतात. मात्र हा खर्च टाळून अध्यात्मिक वारसा जपण्याचे काम भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. नगरसेवक विक्रांत लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून श्री रामकथा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हभप समाधान महाराज शर्मा यांच्या माध्यमातून रामकथा नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. इंद्रायणी नगर येथील शाम आगरवाल मैदानात सात दिवस हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विराज लांडे, नव महाराष्ट्र तरुण मंडळ कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तर माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाबाबत नगरसेवक विक्रांत लांडे म्हणतात की रामराज्य याला हवे ही सगळ्यांची भावना आहे. श्री राम हे कोणत्या पक्षाची प्रॉपर्टी नाही. तर श्री राम म्हणजे विवेक, स्वातंत्र्य, समता आणि अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे श्री राम कथा सर्व नागरिकांसमोर जाणे गरजेचे आहे. याचं उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे विक्रांत लांडे यांनी सांगितले.

8 ते 14 मार्च दरम्यान सकाळी 6 ते साडे नऊ पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मध्ये मंगळवारी (दि.8) रोजी ग्रंथमहात्मय शिव पार्वती विवाह कथा सांगण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ०९) श्रीराम जन्मोत्सवाची कथा,  गुरुवारी (दि.१०) सीताराम स्वयंवर, शुक्रवारी (दि.११) राम वनवास आणि केवट प्रसंग सांगण्यात येणार आहे. शनिवारी (दि.१२) भरत राम भेटीचा प्रसंग ऐकायला मिळणार आहे. रविवारी (दि. १२) शबरी राम मिलन, हनुमान भेटीचा प्रसंग ऐकायला मिळणार आहे. तर सोमवारी (दि. १४) युध्द प्रसंग, रावण दहन आणि श्रीराम राज्याभिषेकाचा कथा नागरिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share to