माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश पदावर नियुक्ती

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगरच्या माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषदेच्या सदस्या आमदार उमा खापरे यांनी पालांडे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

सुजाता पालांडे या कार्यक्षम नगरसेविका म्हणून चर्चेत राहिल्या आहेत. संत तुकारामनगरमधून त्या दोनवेळा महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. अत्यंत अभ्यासू व सुशिक्षित, मनमिळाऊ व्यक्तीमत्व असल्यामुळे त्यांना नागरिकांनी दोनवेळा निवडून दिले. दरम्यान, दहा वर्षाच्या कालखंडात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन भाजपाने त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

Share to