आजची महिला आर्थिक पातळीवर सक्षम होऊ पाहतेय – अनिता संदीप काटे
- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या आवारात सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने उपस्थित विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करीत सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. कल्पना थांगे, मॉडर्न कॉलेजच्या लेक्चरर पूजा परतणे, लेखिका शीतल माने, सुषमा उपाध्याय, फलक गांधी, पालक प्रतिनिधी खोरगडे आणि सोसायटी परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
२१ व्या शतकात महिलेने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली आहे. आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक अशी अनेक क्षेत्रे प्रगतीसह सर केली आहेत. तिच्यासाठी हा अभिमानाचाच दिवस आहे. महिलांची प्रत्येक क्षेत्रातली कामगिरी आज उंचवणारी ठरली आहे. कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांची सेवा करण्यामध्ये ७० से ८० टक्के महिलांनी योगदान दिले होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्येही महिला आता अधिक चांगले योगदान देताना दिसत आहेत. त्यांची निर्णय क्षमताही अचूक आहे. आजची महिला आर्थिक पातळीवर सक्षम होऊ लागली आहे. महिला सबलीकरणाच्या कार्यामध्ये अनेक महिला एकमेकींच्या साथीने प्रगतीची शिखरे सर करीत आहेत, हि अभिमानास्पद कामगिरी असल्याची भावना सौ. अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केली.