सोशल मीडियावर ‘व्हिजन-2020’ मधील ‘सर्जिकल स्ट्राईक’ वर प्रश्नचिन्ह?

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा; भोसरी-दिघी रस्त्याची दुरवस्था

पिंपरी – भोसरी-दिघी रस्ता एका रातोरात करुन भोसरीच्या आमदारांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा दावा केला होता. मात्र, त्या व्हिजन-2020 मधील रस्त्यांकडे विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्या रस्त्यांची अवस्था दैयंनिय झाली आहे. भोसरीसह दिघीकरांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा यापेक्षा खराब परस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे समाज माध्यमातून त्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करुन देत हेच का, तुमचं व्हिजन-2020 असा सवाल उपस्थित केला आहे.

भोसरी-दिघीला गावांना जोडणारा रस्ता गेली पंचवीस वर्षे रखडलेला होता. त्या रस्त्याचे काम एका रात्रीत पूर्ण केले. त्यावर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. महापालिकेच्या हद्दीतील भोसरी ते दिघी जोडणारा सावंतवाडी रस्ता पालिकेत समावेष झाल्यापासून प्रलंबित होता. स्थानिक जागा मालकांच्या मतभेदाने हा रस्ता अपुर्ण होता. भूसंपादन आणि त्याद्वारे मिळणा-या मोबदल्यावरुन काही जागा मालकांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. परिणामी, दिघीतील सुमारे ८० ते ९० हजार लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांना भोसरीकडे ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत होती.

दरम्यान, भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने एका रात्रीत रस्त्याचे काम मार्गी लावले, असा दावा केला होता. परंतू, त्यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यावरुन सोशल मीडियावर ‘सर्जिकल स्ट्राईक नंबर 2 भोसरी-दिघी रस्ता’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध होवू लागल्या आहेत. तसेच व्हिजन-2020 वर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकदंरीत भोसरी-दिघी रस्त्यांची अवस्था खुपच खराब झाल्याने वाहनचालकांसह स्थानिकांनी त्याचा त्रास होवू लागला आहे. आता तरी आमदार या रस्त्याकडे लक्ष देतील का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Share to