स्मार्ट सारथी अॅपची सेवा तीन दिवस बंद, महापालिकेचे आवाहन

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप आणि वेब पोर्टल हे अधिकृत स्मार्ट फोन अॅप आणि वेब पोर्टलची सेवा अद्ययावतीकरणासाठीच्या कारणामुळे तीन दिवस तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे.

सदर अॅप आणि वेब पोर्टलची सेवा अद्ययावत करण्यासाठी त्याचे ईएसडीएस क्लाउडवरून महापालिकेच्या आयसीसीसी डेटा सेंटरच्या सर्व्हरवर स्थलांतर (मायग्रेशन) करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी अॅप आणि वेब पोर्टलची सेवा बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने दि. २५/०३/२०२२, सकाळी ८ वाजल्यापासून ते दि. २७/०३/२०२२, रात्री ९ पर्यंत पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप आणि वेब पोर्टलची सेवा तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही सेवा पूर्ववत सुरु करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share to