पिंपळे सौदागरमध्ये ‘सौदागर क्रिकेट प्रीमियर लीग’चे आयोजन
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील खेळाडुंसाठी सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे यांच्या वतीने “सौदागर क्रिकेट प्रीमियर लीग”चे आयोजन करण्यात आले आहे.
२५, २६ व २७ मार्च रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळेत क्रिकेटचे सामने चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहेत. यासाठी पिंपळे सौदागरमधील खेळाडुंनी क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजक निलेश काटे यांनी केले आहे.
क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेणा-या स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विजेत्या खेळाडुंना चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये, द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार व चतुर्थ पारितोषिक ५ हजार रुपयांचे राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी दिली.