खंडाळा बोर घाटात सिमेंटचा ट्रक कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील किमी 36 जवळ आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास सिमेंटची पोती घेऊन जाणारा ट्रक (MH 46 DM 7806) सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेटोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग पोलीस, लोकमान्यची टिम मृत्यूंजय, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत मयत चालकाला गाडीखालून बाहेर काढले. ढेकू गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Share to