वाढत्या महागाई विरोधात मनसे उतरली रस्त्यावर, मोदी सरकारचा पिंपरी चौकात निषेध
पिंपरी (प्रतिनिधी) – महागाईच्या निषेधार्त मनसेने आज केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. आंदोलनात घरगुती गॅस, खाद्य तेल, पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य व दैनंदीन वापरात येणा-या वस्तुंच्या किंमतींचे भाव गगनाला भिडल्याकडे लक्ष वेधले. ही महागाई सर्वसामान्य नागरिकांना अहस्य झाली असून याच्या निषेधार्त मनसेने आज केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, दत्ता देवतरासे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, सुजाता काटे, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, अनुज महाजन, प्रफुल्ल कसबे, नितीन चव्हाण, नारायण पठारे, आकाश पांचाळ, राजू भालेराव, विनोद भंडारी, नारायण पठारे, फैयाज नदाफ, ॲलेक्स मोजेस, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, हेमंत डांगे, बाळा दानवले, शिशीर महाबळेश्वरकर, जय सकट, प्रदीप घोडके, निलेश नेटके, आकाश लांडगे, रॉबिन त्रिभुवन, विशाल साळुंखे, गणेश उज्जनकर, परमेश्वर त्रिमले, नीरज कांबळे, कृष्णा महाजन, स्नेहल बांगर आदींचा आंदोलनात सहभाग होता.