शरद पवार वाढदिवस : पवारांनी साधला कार्यकर्त्यांशी ऑनलाईन सभेद्वारे संपर्क
- कार्यकर्त्यांनी केक कापून केला वाढदिवस साजरा
पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिचंवड विधानसभा मंतदार संघामध्ये रहाटणी येथील विमल गार्डन येथे परिवार संवाद थेट ॲानलाईन सभा घेण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी चिंचवड विधानसभेच्या वतीने पवार व इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मोठ्या उत्साहात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या निमित्ताने केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसवेक मयुर कलाटे, नगरसेवक कैलास थोपटे, मा. पीसीएमटी चेअरमन दिलीप बालवडकर, मा. नगरसेविका शमीम पठाण, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, मा. स्वीकृत नगरसेवक सागर कोकणे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष कुणाल थोपटे, चिंचवड विधानसभा युवक कार्याध्यक्ष शाम जगताप, युवा नेते तानाजी जवळकर, कार्याध्यक्ष गोरक्षनाथ पाषाणकर, प्रशांत सपकाळ, स्वीकृत नगरसेवक गोरख लोखंडे, नवनाथ नढे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे, बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा पुष्पा शेळके, परिसरातील सर्व आजी माजी नगरसेवक व राष्ट्रावादी कॅाग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.