यमुनानगरमधील ४५० नागरिकांनी पाहिला ‘द काश्मीर फाईल्स’

पिंपरी (प्रतिनिधी) – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि. २७) मा. क्रीडा सभापती व नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १३ मधील ४५० नागरिकांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला.

आमदार महेश लांडगे यांनी आम्हा सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांना मोफत चित्रपट दाखविला. त्याअनुषंगाने तिकीटाचे दर महाग असल्याने सर्वसामान्यांना ते पाहता येत नव्हते. तसेच, जास्तीत जास्त महिलांसाठी हा चित्रपट दाखविण्यात आला. कारण महिलांना त्यांच्या व्यस्त कामात चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याने म्हणून आम्ही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं केंदळे यावेळी म्हणाले.

Share to