आकुर्डीतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव आजपासून सुरू

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शॉपींग मॉल्स, कॉम्प्लेक्स, सिनेमा गृह, नाट्यगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, जीम, स्पा, स्विमींग पूल, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. त्याच धरतीवर जलतरण तलाव सुरू करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली आहे.

आकुर्डी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. शनिवार ते गुरूवार सकाळी 6 ते 10 व दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत तलाव सुरू राहील. साप्ताहीक सुट्टी शुक्रवारी राहील. नागरिकांनी जलतरण लावात पोहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी केले आहे.

Share to