राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्याला पिंपरी-चिंचवडमधून हजारो नागरिक शिवतीर्थावर जाणार

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहर गुडीपाडवा मेळाव्यानिमित्त जल्लोषात हिंदुजननायक राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवतीर्थ, मुंबई या ठिकाणी जाणार आहेत, त्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांची बुधवारी (दि. 30) बैठक झाली. याबाबत निर्णय घेण्यासाठी पिंपरीतील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, चिंचवडमधील हेमंत डांगे यांचे जनसंपर्क कार्यालय तसेच भोसरीतील विशाल मानकरी यांच्या निवासस्थानी बैठका झाल्या. या बैठका गणेश सातपुते (प्रभारी पिं. चिं. शहर), किशोर शिंदे (प्रभारी पिं. चिं. शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त अतिशय जल्लोषात  पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच ज्या नागरिकांना माननीय राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी यायचे आहे. अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय या ठिकाणाहून बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शनिवार (दि. 2) दुपारी बाराच्या सुमारास बस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी व महाराष्ट्र सैनिक  यांनी राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

Share to