मोशीत पोस्ट ऑफीस झाले सुरू, कोणता आहे पीन कोड

पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या २० वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफिसची सुविधा वापरावी लागत होती. वारंवार मागणी करूनही मोशीला स्वतंत्ररित्या पिनकोड नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मोशी पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.

मोशी परिसरासाठी स्वतंत्र विद्या शहरी भागाशी जोडलेले पोस्ट कार्यालय आजपासून कार्यान्वित झाले आहे. निर्देशक डाक सेवा सिमरन कौर, पुणे शहर पूर्व विभाग प्रवर अधीक्षक डाकघर गोपराजू सतीश, चिंचवड सुपर टाक निरीक्षक सी. एम. नदाफ, पोस्ट मास्तर जनरल पुणे रिजन मधुमिता दास, जनसंपर्क निरीक्षक के एस पारखी, यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मोशी परिसर २० वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफीसला जोडला होते. याला ग्रामीण पिन कोड असल्यामुळे अडचणी येत होत्या. तसेच, पोस्टमनची कमतरता होती. आता पोस्ट ऑफीस शहरी भागात जोडल्यामुळे नवीन पिन कोड (411070) झाला आहे. यामुळे अडचणी येणार नाही. पोस्टमन संख्या  वाढवली जाणार आहे. विशेष म्हणजे, नवीन आधार केंद्रसुद्धा पोस्ट ऑफीसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. मोशीतील पोस्ट ऑफीसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी माजी नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे. लोकार्पण पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले.

Share to