पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथे रेल्वे जंक्शन विकसित करण्यासाठी निधा द्या
- आमदार लक्ष्मण जगताप यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) – झपाट्याने विकसित होत असलेल्या उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येतही वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण आणि जिल्ह्याच्या वाढीमुळे शहरातील नागरिकांसाठी असलेले पुणे रेल्वे जंक्शन अपुरे पडत असल्याने पर्यायी जंक्शन विकसित करणे आवश्यक आहे.
पिंपरी येथील डेअरी फार्मसाठी संरक्षण विभागाला यापूर्वी देण्यात आलेली सुमारे ५० ते ६० एकरजमीन वापराविना पडून आहे. सदर जमीन पुणे मुंबई रेल्वे लाईनला लागून असून मध्यवर्ती आहे. नवीन जंक्शन विकसित करण्यासाठी या जमिनीचा वापर केल्यास पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे सोयीचे होण्याकरिता पिंपरी जंक्शन विकसित करण्यासाठी निधी मंजूर करण्याबाबत आणि पिं.चिं.मनपा हद्दीतील चिंचवड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे.