सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतिक असलेल्या रमजान महिन्याचा प्रारंभ

  • मा. नगरसेवक राजू बनसोडे व युवासैनिक निलेश हाके यांनी दिल्या शुभेच्छा

पिंपरी (प्रतिनिधी) – आजपासून पवित्र रमजान मासारंभ महिना सुरू झाला. वाईट प्रवृत्तींना झटकून सद्गगुणांना आचरणात आणण्याचा हा महिना आज पहिला रोजानिमित्त सामाजिक एकोपा जपत मदरसा फैजुल उलूम दापोडी येथील मुस्लिम बांधवासह रोजा ईफ्तारी करण्यात आली.

याप्रसंगी उन्हाचा पारा 30°c असताना ऐन उन्हाळ्यात सर्व मुस्लिम बांधवासह लहान मुलेही उपवास करतात. खरच त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच मी अल्लाह (परमेश्वर) चरणी प्रार्थना करतो कि संपूर्ण महिनाभर त्यांना शक्ती देवो व त्यांची प्रार्थना अल्लाह चरणी कबूल होवो तसेच सामाजिक ऐक्य व सद्भावनाचे प्रतिक असलेल्या रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याप्रसंगी नगरसेवक राजा बनसोडे, पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके, मौलाना कारी इकबाल, सिकंदर शेख उपस्थित होते.

Share to