पिंपरी-चिंचवडमधील मिना मोहिते यांच्यावर राज्याची जबाबदारी

  • राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील मिना मोहिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड घोषीत केली आहे.

मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित विभाग पुणे जिल्हाध्यक्ष असताना समाजातील असंघटित कामगारांची एकजूट तयार केली. आपल्या हक्कापासून वंचित झालेल्यांना सन्मान मिळवून दिला. संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपविली आहे.

Share to