डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वचे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन (बानाई) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्व २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील तरूण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

बुधवार दि.१३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे डॉ.शांतीलाल रुंदवाल आणि प्रा. प्रवीण तायडे  हे परदेशातील नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक मार्गदर्शन करणार आहेत. तर शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ रोजी सावित्रीबाई फुले सभागृह येथे सायंकाळी ४ वाजता अशोक देशमुख हे  महिला कौशल्य विकास उद्योजकतेचा परिचय करून देणार आहेत. तसेच बुधवार दि. २०एप्रिल २०२२ रोजी मोरवाडी आय. टी. आय. या ठिकाणी सकाळी १० वाजता  सहाय्यक संचालक कौशल्य विकास यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील जास्तीत जास्त तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महिलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी  या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share to