महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले. 

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारवनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. 

यावेळी राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व परीविक्षाधिन पोलीस अधिकारी तेजबिर सिंह संधू यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गजानन देशमुख आणि आशा स्वामी यांना जिल्हास्तरीय प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. नेहरु युवा केंद्रातर्फे शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाऊंडेशनचे डॉ. बच्चुसिंग टाक यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे देण्यात येणारे जिल्हास्तरीय पुरस्कार रोबोलॅब टेक्नोलॉजीच्या अमोल गुल्हाणे आणि अनंत इंडस्ट्रिजच्या चेतन धारीया यांना प्रदान करण्यात आला. 

उपवनसंरक्षक पुणे विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वनपाल प्रकाश चौधरी आणि एम.एस.शिरसाठी यांना  तर कामगार आयुक्तालय मुंबईतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार ज्ञानेश्वर हिवराळे आणि रुपाली वाघ यांना प्रदान करण्यात आला. सहा.पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सहायक पोलीस फौजदार धनंजय कदम यांना केंद्रीय गृहमंत्री पदक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक बळीराम पोळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे आणि हेड कॉन्स्टेबल महोम्मद मोमिन यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 

Share to