पिंपरी-चिंचवडला चौथा आमदार मिळणार, भाजपाच्या उमा खापरे यांना विधानपरिषदेवर संधी ?

पिंपरी (प्रतिनिधी) – भाजपकडून पिंपरी-चिंचवडला विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत उमा खापरे या दोनवेळा भाजपाच्या नगरसेविका राहिल्या आहेत. 2001-02 मध्ये त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदेश भाजपा कार्यकारणीत गेली 20 वर्षे त्या विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत.

आता  खापरे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शहराला चौथा आणि शहर भाजपला तिसरा आमदार मिळणार आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Share to