पालकांनो अनधिकृत शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश घेऊ नका – संजय नाईकडे
पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एकूण 8 प्राथमिक शाळा बेकायदेशीरपणे चालविल्या जात आहेत. पालकांनी आपल्या पाल्यास अशा अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळेत प्रवेश घेऊ नये. प्रवेश घेतल्यानंतर संबंधित पाल्याच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी संबंधित पालकांची राहिली, अशी सूचना शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
या आहेत अनधिकृत शाळा…
- ज्ञानराज प्राथमिक शाळा, कासारवाडी (मराठी)
- मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी (इंग्रजी)
- मास्टर केअर इंग्लिश स्कूल, भोसरी (इंग्रजी)
- ग्रॅट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, चिखली, (इंग्रजी,
- एम.एस.स्कूल फॉर किड्स, सांगवी (इंग्रजी)
- साई स्कूल ऑफ एक्सलेन्स, पिंपळे सौदागर (इंग्रजी)
- सेंट रोझरी इंग्लिश मिडीयम स्कूल (चिखली)
- माने इँग्लिश स्कूल राजवाडेनगर (रहाटणी, काळेवाडी)
शहरातील या शाळांना अनधिकृत शाळा म्हणून महापालिकेने घोषीत केले आहे. या शाळा अनधिकृत असल्याने शाळा बंद करण्याबाबत त्यांना शिक्षण विभागामार्फत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. परंतु, येणा-या काळात विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान करणा-या अशा शाळा पुन्हा सुरू होणार नाही, म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कडक करावाई करण्यात येणार आहे, असे नाईकडे यांनी सांगितले.