च-होली फाट्यावर महापालिकेची धडक कारवाई
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “ई” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्र. क्र. ०३, च-होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथील नियोजित ४५ मी. रुंद रस्त्याने बाधित उर्वरीत अतिक्रमणांवर बुधवारी (दि. ८) महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण २० (पत्राशेड /वीट बांधकामे/ आर.सी.सी.) अंदाजे क्षेत्रफळ (२१,३९० चौ. फुट) अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.