उमाताई खापरे पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम महिला आमदार होणारच – सौ. कुंदाताई भिसे
- कुंदाताईंकडून खापरे यांचे निवडीबद्दल प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन
पिंपरी (प्रतिनिधी) – विधानपरिषदेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातून भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा तथा जेष्ठ नेत्या उमाताई खापरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून आमदारकीची उमेदवारी मिळाल्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
भाजपा चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा तथा उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी उमाताई खापरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत रंजनाताई गावडे, उज्वलाताई गावडे, कोमल कोहळ, पल्लवी वाल्हेकर, रंजनाताई उपस्थित होत्या.
कुंदाताई भिसे खापरे यांचे कौतुक करताना म्हणाल्या, उमाताई या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. पक्षात महिला संघटन मजबूत करीत असताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. अनेक महिला कार्यकर्त्या घडविल्या. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. त्या नक्कीच निवडणुकीची पुढची पायरी यशस्वीपणे पार करून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून येतील आणि पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम महिला आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.