राष्ट्रीय रायफल चॅम्पियनशिप स्पर्धेत तिघांनी मारली बाजी
पिंपरी (प्रतिनिधी) – वर्ल्ड एअरगन फेडरेशन व एअरगन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने राष्ट्रीय रायफल चॅम्पियनशिपचे आयोजन युथ होस्टेल, मिरामार, पणजी गोवा या ठिकाणी (दि. 28 ते 1 जून) दरम्यान करण्यात आले. महाराष्ट्राच्या संघामध्ये पिंपरी-चिंचवड व पुणे येथील तीन स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेतील विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे
चेतन पवार (20 मिटर रौप्य पदक)
सुरेश कांबळे (20 मिटर रौप्य पदक)
सुशीला कांबळे (20 मिटर रौप्य पदक)
या सर्व विजयी खेळाडूंचे तसेच एअरगन असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड (पुणे)चे सचिव विजय टेपुगडे यांचा सत्कार अमित गोरखे (अध्यक्ष नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट) यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महेश नलावडे यांनी केले. सूत्र संचालन प्रीतम क्षीरसागर यांनी केले.