पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी देहू संस्थानकडून खास रिसर्च केलेली पगडी

पिंपरी (प्रतिनिधी) – आषाढी वारीसाठी संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या स्वागताची देहू संस्थानतर्फे लगबग सुरू आहे. मोदींसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले या डिझायनरकडे तुकाराम पगड्या आणि उपकरणे तयार करण्यात येत आहेत.   

पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांच्या वर्कशॉपमध्ये पगड्या तयार केल्या जात आहेत. या पगड्या वैशिष्ट्यपूर्ण बनविण्यासाठी खास रिसर्च करून त्यावर काम केले जात आहे. पगड्यांवर पारंपारिक पद्धतीने हस्तलिखित गाथा कारागिरांनी लिहिली असून ती अकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

Share to