राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया, मनसेकडून मोरया गोसावी मंदिरात अभिषेक व प्रार्थना
पिंपरी (प्रतिनिधी) – हिंदुजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. यशस्वी शस्त्रक्रियेसाठी पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने चिंचवड येथील जागृत देवस्थान श्री साधू मोरया गोसावी मंदिरात अभिषेक घालून प्रार्थना करण्यात येत आहे. आज सकाळी सात वाजता मोरया गोसावींना पंचामृत अभिषेक घालून राज ठाकरे यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मनसे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मा. नगरसेवक सचिन चिखले, मा. नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, राजु सावळे, बाळा दानवले, राजु भालेराव, विशाल मानकरी, मयुर चिंचवडे, सुशांत साळवी, शैलेश पाटील, नितिन चव्हाण, सुमित कलापुरे, बालाजी पांचाळ, विशाल उकिरडे, जितेश वाल्हेकर, निलेश नेटके, नारायण पठारे, के. के. कांबळे व योगीता कांबळे हे सर्व मोरया गोसावी मंदीरामध्ये अभिषेक करण्यासाठी उपस्थित होते.
हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत राज ठाकरे यांनी राज्यात विराट सभा घेतल्या. त्यांच्यावर प्रेम करणा-या युवकांची त्यांना खंबीर साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्या सभा मोठ्या प्रमाणावर गाजल्या. दरम्यान, त्यांना शारिरीक आजरपानाला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांनी पुढील काही नियोजित सभा व कार्यक्रम रद्द केले. त्यांच्यावर आजरोजी शस्त्रक्रिया होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील मनसेच्या सैनिकांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होण्यासाठी देवाकडे याचना केली आहे.