आषाढीवारी सुलभ व आरोग्यदायी होण्यासाठी पालिकेकडून प्रथमोपचार पेटीचे अनावरण

पिंपरी – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन आज मंगळवारी (दि. 21) तर उद्या बुधवारी (दि. २२) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. आषाढीवारी पालखी यात्रा सुलभ, आरोग्यदायी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रथमोपचार पेटीचे अनावरण आणि संपर्क माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी अग्निशमन यंत्रणा, मार्गक्रमण करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी समवेत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, उपायुक्त रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी, सचिन ढोले, मुख्य अग्नीशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

Share to