‘उद्धवसाहेब शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत…’ पिंपरी-चिंचवड शिवसैनिकांची घोषणाबाजी
पिंपरी – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून आमदारांचा गट फोडला. आता शिवसेना दोन गटात विभागली आहे. एकनाथ शिंदे विरूद्द उध्दव ठाकरे असे गट असून पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने उध्दव ठाकरे यांना समर्थन देत गुरूवारी (दि. 23) आंदोलन करण्यात आले. उध्दवसाहेब शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबतच.., अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या या आंदोलनात शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.