पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयात अँटी करप्शनची धाड

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या दालनात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

आजची स्थायी समिती सभा संपल्यानंतर ही धाड पडल्याने खळबळ उडाली आहे. धाड पडताच नगरसेवकांची पळापळ सुरू झाली. सभापतींनी तात्काळ कार्यालयातून पळ काढला.

Share to