अरविंद वाळेकर यांचे पोलिस संरक्षण पूर्ववत करावेत, याबाबत लक्ष घालावे – पिंपरी युवासेना

पिंपरी- अंबरनाथ शहराचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना राज्यात झालेल्या चालू घडामोडी नंतर शिंदे गटात सामील न झाल्याच्या कारणावरून त्यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले.

शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर २०११ साली जीवघेणा हल्ला झाला होता. त्या दिवसापासून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. परंतु, शिंदे गटात सामील न झाल्याने एका कडवट शिवसैनिकाचे खच्चीकरण करत सूडबुद्धीने त्यांना दिलेले पोलीस संरक्षण काढण्यात आले.

तरी, या प्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष देत पाठपुरावा करून त्यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत मागणी करावी, असे निवेदन पिंपरी चिंचवड युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके व माऊली जगताप ह्यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई ह्यांच्याकडे दिले.

Share to