Rain Alert : पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळांना वाढीव सुट्ट्या जाहीर
पिंपरी- हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळांना वाढून सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भात आज नव्याने आदेश काढला आहे.
उपरोक्त विषयांन्वये पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे. त्यानुसार मा . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण , पुणे यांनी दिनांक -१६ / ०७ / २०२२ अखेर इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून पुणे जिल्हातील सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांना दिनांक- १३/०७/२०२२ रोजीच्या आदेशांन्वये सुट्टी घोषित केलेली आहे.
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत : अनुदानित) शनिवार दि. १६/०७/२०२२ अखेर सुट्टी घोषित करण्यात आली आहे.