प्लास्टीक पिशव्या वापरणा-या दुकानांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशानुसार ग्रीन मार्शल पथकास प्लास्टिक पिशव्या वापरणा-या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याकामी ग्रीन मार्शल पथकांने दिनांक २०/०७/२०२२ रोजी दवाबाजार चिंचवड येथील सात अस्थापनावर बंदी असलेले प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ४० हजार रुपये दंड आकारून कारवाई करण्यात आली आहे. संबंधीता कडून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
दिनांक २१/०७/२०२२ रोजी पिंपरी येथेल मुख्य बाजारपेठेत दैलत ट्रेडर्स या आस्थापनेवर कारवाई करून१५० किलो बंदि असलेले प्लास्टिक जप्त केले तसेच संबधित अस्थापनेवर दंडात्मक कारवाई ही केली. दिनांक २२/०७/२०२२ रोजी बाणेर येथील नामांकीत हॉस्पीटलने पिंपरी डेअरी फ्रार्म रसत्यावर त्यांचे बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचे निदर्शनास आले बाबत संबंधितावर र.रू.३५,०००/- दंडात्मक कारवाई केली तसेच सदर बायोमेडिकल वेस्ट त्यांच्याकडून उचलुन घेण्यात आले कामी ह क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रीन मार्शल पथकाने हि कारवाई केली.
दिनांक २२/०७/२०२२ रोजी शाहूनगर, चिंचवड येथील नामांकीत हॉस्पीटलने आपला बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकल्या प्रकरणी संबंधीतावर र.रू. ३५,०००/- दंडात्मक कारवाई अ क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी / अंमलदार , महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) जवान आणि तृतीय पंथीय पथके यांचा समावेश असलेल्या ग्रीन मार्शल पथकाकडून सदर कारवाया करण्यात आल्या.